पाटेठाणला औद्योगिक सुरक्षिततेची शपथ
राहू, ता. ८ : पाटेठाण (ता.दौंड) येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यावर कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षितता जपण्यासाठी ‘राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वांनी सामूहिक औद्योगिक सुरक्षितता शपथ घेतली.
राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्त सुरक्षा विषयक माहिती, सुरक्षा साहित्याचे प्रदर्शन, सुरक्षा पोस्टर आदी उपक्रम राबवून सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. सुरक्षा साहित्याचा वापर कसा करायचा? कामगारांना आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजना तसेच स्वत:चा व इतर कामगारांचा बचाव कशा पद्धतीने करावयाचा? याचे प्रात्यक्षिक दाखविले गेले.
यावेळी मेजर सुरेंद्र सिंग यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
कारखान्यातील कर्मचार्यांनी सुरक्षेचे सर्व नियम पाळावेत.कर्मचारी सुरक्षेसाठी आवश्यक सुरक्षा साधने कारखाना पुरवीत आहे. ‘शुन्य अपघात’ हे उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचे आहे, असे कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी सांगितले.
यावेळी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. रासकर, आर.एन. यादव, एन. ए. भुजबळ, आर. एस. शेवाळे, डी.व्ही. रणवरे, व्ही. डी. गायकवाड कारखान्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी सहभाग घेतला होता.
03732
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

