राहूच्या उत्कर्षाचा रक्षा खडसे यांच्या हस्ते सत्कार
राहू, ता. ११ : दिल्ली येथे इंदिरा गांधी स्टेडियममध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय किंग बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या राहू (ता. दौंड) येथील उत्कर्षा रणजीत शिंदे हिचा महिला दिनाच्या निमित्ताने पुणे येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उत्कर्षा ही राहू येथील कैलास विद्यामंदिर माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत आहे. तीने भारत सरकार मंत्रालयाद्वारा खेलो इंडिया आयोजित किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये मध्यप्रदेश इंदूर येथे सुवर्णपदक, तसेच सन २०२५मध्ये दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेही एक सुवर्ण व दोन कांस्यपदक मिळवले आहे. चेन्नई येथे झालेल्या नॅशनल किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये एक सुवर्ण व एक सिल्वर पदक, तसेच महाराष्ट्रामध्ये झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये सलग पाच सुवर्णपदक मिळवली आहेत.
सत्काराप्रसंगी औरंगाबादचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, किक बॉक्सिंग अध्यक्ष संतोष अग्रवाल, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नीलेश शेलार, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, स्पोर्ट्स ऍथॉरिटी ऑफ इंडियाच्या संचालिका डॉ. मोनिका घुगे आदी उपस्थित होते.
उत्कर्षा हिला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सतीश राजहंस, शिवानी राजहंस, स्टेडियमवर मार्गदर्शक करणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू ओंकार राठोड, दीपा गवळी यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.
मला लहानपणापासूनच किक बॉक्सिंगची आवड होती. माझे प्रशिक्षकांनी माझ्याकडून नेहमीच कसून सराव करून घेत होते. सरावामध्ये देखील मी कायम सातत्य ठेवल्यामुळे मला फिटनेसमध्ये राहता आले. त्यामुळेच मला आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत यश मिळाले. यशामागे माझे प्रशिक्षक, माझे आई- वडील व आजी- आजोबांसह सर्वांचा आशीर्वाद आहे.
- उत्कर्षा शिंदे, खेळाडू
03734
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

