अज्ञात उपकरण सापडल्याने वाफगाव येथे खळबळ

अज्ञात उपकरण सापडल्याने वाफगाव येथे खळबळ

राजगुरुनगर, ता. १ : वाफगाव (ता. खेड) येथे बुधवारी (ता. ३१ मे) सकाळी एका शेतात एक अज्ञात उपकरण सापडल्याने खळबळ उडाली होती, पण पोलिस तपासणीत हे उपकरण हवामान विभागाचे असल्याचे लक्षात आल्यावर सर्व शंकांचे निरसन झाले.
वाफगाव येथील ''तळ्याचा माळ'' भागात शेतकरी शंकर भालेकर फेरफटका मारत असताना त्यांना ही अज्ञात वस्तू आकाशातून खाली येताना दिसली. भरत रामाणे यांच्या शेतात ती पडली. या उपकरणात पांढऱ्या रंगाचा धागा व पांढऱ्या रंगाचा फुगाही होता. वाफगाव ग्रामस्थांनी या घटनेची माहिती खेडचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांना दिली त्यानंतर खेड पोलिस ठाण्याचे बाळकृष्ण साबळे, सुनील बांडे आदींचे पथक त्याठिकाणी गेले. ते उपकरण हवामान विभागाचे असावे असा त्यांनी सर्वांचा प्राथमिक अंदाज लावला. त्यानंतर त्या उपकरणाचे फोटो काढून त्याची बारकाईने पाहणी केली. ते उपकरण ''रेडीओसोंड डीटीआर'' नावाचे असल्याचे समजले. ते हवामान मोजण्याचे असल्याची खात्री झाली.
पोलिसांनी पुणे येथील हवामान विभागाला माहिती दिली. हवामान विभागाचे अधिकारी टी. सी. मोहाडीकर यांनी सदरचे मशिन त्यांच्या विभागाचे असल्याची पुष्टी दिली. हे उपकरण तापमान, हवामानातील आद्रता, हवेचा दाब, उंची, हवेची दिशा, हवेचा वेग मोजण्यासाठी वापरण्यात येते. ते जमिनीपासून ३५ ते ४० किलोमीटर उंचीवर आकाशामध्ये काम करत असते. त्याचा कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा दिला.
02474

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com