जिल्ह्यात आज ६५० ठिकाणी 
किसान समृद्धी केंद्रांचे उद्‍घाटन

जिल्ह्यात आज ६५० ठिकाणी किसान समृद्धी केंद्रांचे उद्‍घाटन

राजगुरुनगर, ता. २६ : पुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता. २७) एकाच दिवशी ६५० प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचे उद्‍घाटन होत असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते गुरुवारी देशभरातील प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचे उद्‍घाटन होणार असून, देशात २ लाख ८ हजार, महाराष्ट्रामध्ये १४ हजार, तर पुणे जिल्ह्यामध्ये ६५० हून अधिक केंद्राचा समावेश यामध्ये आहे. पुणे जिल्हा भाजपच्या माध्यमातून खेड तालुक्यातील कुरकुंडी या गावात या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच प्रत्येक तालुक्यामध्ये ५० हून अधिक केंद्रांचा प्रारंभ होणार आहे, असे बुट्टे पाटील यांनी सांगितले.
या वेळी भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय थोरात, जिल्हा संघटक जयसिंग एरंडे, तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, संजय रौंधळ, नवनाथ अरगडे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com