गुळाणी ग्रामपंचायतीत शासकीय रकमेचा अपहार

गुळाणी ग्रामपंचायतीत 
शासकीय रकमेचा अपहार
Published on

राजगुरुनगर, ता. १८ : खेड तालुक्यातील गुळाणी ग्रामपंचायतीमध्ये शासकीय कामात अनियमितता करणे, ग्रामपंचायत अभिलेखामध्ये बनावट नोंदी करणे, खाडाखोड करून फेरफार करणे, अभिलेख गहाळ करणे आणि ४७ हजार रुपयांच्या शासकीय रक्कमेचा अपहार करणे, या आरोपांखाली तीन माजी सरपंच आणि तीन ग्रामसेवकांवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
गुळाणीचे ग्रामस्थ ॲड. ज्ञानेश्र्वर रोडे यांनी, गुळाणी ग्रामपंचायतीत सन २००४ ते २०१९ या कालावधीत झालेल्या कथित गैरव्यवहारांबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याप्रकरणी सुनावणी घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पंचायत समितीला दिलेल्या आदेशानंतर याप्रकरणी विस्तार अधिकारी सोमनाथ कारंडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली. त्यांनी ग्रामपंचायत अभिलेख, कागदपत्रे पाहून चौकशी अहवाल सादर केला. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी खेड पंचायत समितीस गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कारंडे यांनी १४ ऑगस्ट रोजी खेड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
या तक्रारीवरून खेड पोलिसांनी माजी सरपंच बाळासाहेब सुतार, माजी सरपंच दिलीप ढेरंगे, माजी सरपंच कुंदा ढेरंगे, तसेच तत्कालीन ग्रामसेवक मनीषा वळसे, एस. टी. जोशी व अनिता आमराळे यांच्या विरोधात फसवणूक करणे, अभिलेख गहाळ करणे, त्यात फेरफार करणे, शासकीय रकमेचा अपहार करणे इत्यादी आरोपांखाली गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी उच्च न्यायालयातील तक्रारदार रोडे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये दाखल गुन्ह्याची माहिती दिली. तसेच, तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी अपहार केलेली ४७ हजार ३०७ रुपये रक्कम शासनाला परत केल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, माजी तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, ज्ञानेश्र्वर ढेरंगे, नरेंद्र वाळुंज, संदीप पिंगळे, माऊली पिंगळे आदी उपस्थित होते.

याप्रकरणी कुभांड रचून आम्हाला गोवण्यात आले असून, खरी वस्तुस्थिती पत्रकार परिषद घेऊन मांडणार आहोत. तसेच, पोलिसांकडेही सत्यतादर्शक कागदपत्रे सादर करणार आहोत.
- दिलीप ढेरंगे, माजी सरपंच, गुळाणी (ता. खेड)

गुळाणी ग्रामपंचायतीतील गैरव्यवहारांसंबंधी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये दफ्तर व कागदपत्रांची सखोल तपासणी पोलिस करतील. त्यानंतर दोषींना अटक करण्यात येईल.
- राजकुमार केंद्रे, पोलिस निरीक्षक, खेड पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com