

राजगुरुनगर, ता. २२ : मोटारसायकल अडवून दोघांना काठीने मारहाण करून आणि त्यांपैकी एकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्याजवळील तीन लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लुटले. ही घटना रविवारी रात्री गुंडाळवाडी (ता. खेड) येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी शांताराम मारुती जैद यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास जैद व त्यांचे शेजारी युवराज भिका बेगडे (दोघेही रा. गुंडाळवाडी, ता. खेड) हे बचतगटाचे जमलेले तीन लाख २० हजार रुपये घेऊन त्यांच्या अंबाबाईनगर वस्तीतील घरी मोटार सायकलवरून जात होते. बेगडे गाडी चालवत होते. ते संतोष भोर यांचे पोल्ट्रीजवळून जात असताना रस्त्याकडेच्या झुडपामधून तीन अज्ञात चोरटे रस्त्यावर आले. त्यांनी मोटारसायकल चालवत असलेल्या बेगडे यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. त्यामुळे दोघेही मोटारसायकलसह खाली पडले. त्याबरोबर चोरट्यांनी दोघांनीही काठीने डोक्यात मारहाण केली आणि त्यांच्या हातातील पैसे व रजिस्टर ठेवलेली पिशवी हिसकावून घेऊन पळून गेले. पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.