राजगुरुनगरला कामगाराचा बसची धडक बसून मृत्यू
राजगुरुनगर, ता. १७ : पुणे- नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर (ता. खेड) बाह्यवळणावर प्रवासी बसची धडक बसल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. १७) पहाटे साडेपाच वाजता घडली. शंकर बबन काळे (वय ३५, मूळ रा. दावडी, सध्या रा. चव्हाणमळा, राजगुरुनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर काळे हे चाकण येथे बेंटलर ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कामाला होते. सोमवारी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कंपनीत कामास जाण्यासाठी ते बाहेर पडले. पुणे- नाशिक महामार्गाच्या बाह्यवळणावरील वाफगावकडे जाणाऱ्या पुलाच्या सेवा रस्त्यावर मोटारसायकल उभी करून ते महामार्ग ओलांडत होते. तेव्हा नाशिक बाजूकडून येणाऱ्या भरधाव प्रवासी बसची (क्र. एमएच १९ सीवाय ६६६१)
त्यांना धडक बसली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. चांडोली ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अपघात झाल्यानंतर बस चालकाने बस तशीच चाकणच्या दिशेने दामटली. महामार्गावरच्या इतर वाहन चालकांनी पाठलाग करून त्यास चाकण येथे पकडले व खेड पोलिस ठाण्यात आणले. एकनाथ राजाराम माळी (वय ४७, रा. खरडई, ता. शिरपूर, जि. धुळे), असे बस चालकाचे नाव आहे. खेड पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

