

राजगुरुनगर, ता. २६ : राजगुरुनगर पाबळ रस्त्यावर होलेवाडी जवळील मांडवळा या वस्तीजवळ भरधाव मोटारीची दुचाकीला धडक बसली. या अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. २५) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. श्रेया संदीप खैरे ( वय १९, रा. चव्हाणमळा, पाबळरोड, साई रेसिडेन्सी, राजगुरुनगर; मूळ रा. खैरेनगर, पाबळ, ता. शिरूर) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री श्रेया खैरे दुचाकीवरून (एम. एच. १४ एफ वाय ३४२२ ) पाबळ बाजूने राजगुरुनगरकडे येत होती. त्याचवेळी होलेवाडी मांडवळाजवळच्या सीएनजी पंपासमोर राजगुरुनगर बाजूकडून येणाऱ्या टोयोटा कंपनीच्या मोटारीची (एम. एच. ४३ सीएम ५०८१ ) तिच्या स्कूटीला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात श्रेया मृत्युमुखी पडली. अपघाताबाबत श्रेयाचे आजोबा काळूराम सीताराम खैरे यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी मोटारचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.