पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे तरुणाची आत्महत्या

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे तरुणाची आत्महत्या

Published on

राजगुरुनगर, ता. २५ : खेड तालुक्यातील एका तरुणाने पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे झाडाला गळफास घेऊन रविवारी (ता. २४) आत्महत्या केली. तत्पूर्वी त्याने आत्महत्येस जबाबदार पत्नी व तिचा प्रियकर व त्याचे वडील असल्याचे चिठ्ठीत लिहिले होते. तरीही खेड पोलिस गुन्हा दाखल करत नव्हते. त्यामुळे नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आणि खेड पोलिस ठाण्याबाहेर पाच सहा तास ठिय्या मांडला. शेवटी रात्री उशिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील एका तरुणाने झाडाला गळफास घेऊन रविवारी दुपारी तीनच्या सुमारास आत्महत्या केली. खेड पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र, या तरुणाने आत्महत्या करण्याअगोदर चिठ्ठी लिहून खिशात ठेवली होती. तीत त्याच्या आत्महत्येला त्याची बायको, तिचा प्रियकर आणि प्रियकराचे वडील जबाबदार आहेत, असे लिहून ठेवले होते. तसेच, ही चिठ्ठी समाजमाध्यमावरही प्रसारित केली होती. त्यामुळे त्याच्या नातेवाइकांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली आणि खेड पोलिस ठाण्यापुढे ठिय्या मांडला. शेवटी रात्री अकराच्या सुमारास पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
तरुणाच्या आईने याप्रकरणी फिर्याद दिली. तरुणाची पत्नी चाकण येथील कंपनीत कामाला जात होती. त्याचा कामाला जाण्यास विरोध होता, म्हणून त्यांच्यात भांडणे होत होती. असाच वाद २३ जुलै रोजी झाल्यावर पत्नी १३ वर्षांची मुलीला घेऊन निघून गेली. त्यावर तरुणाने मुलगी हरवल्याची तक्रार दिली. त्यानंतर त्याची पत्नी २५ जुलैला खेड पोलिस ठाण्यात आली व मुलगी माझ्याबरोबर असून, खेड तालुक्यातील एकाबरोबर माझे प्रेमसंबंध आहेत आणि मी त्याच्याबरोबर लग्न करणार आहे, असे सांगून मुलीला घेऊन निघून गेली.
दरम्यान, तरुण त्यांच्याकडून १५ दिवसांनी मुलीला घेऊन आला. त्यानंतर त्याची पत्नी आणि पत्नीचा प्रियकर हे सतत त्याला, ‘घटस्फोट दे, नाहीतर तुला मारून टाकू,’ अशा धमक्या देत होते. पण, दोन मुले असल्याने तरुण घटस्फोटला नकार देत होता. मात्र, सततच्या धमक्यांनी तो तणावग्रस्त होता. शेवटी त्याने पत्नीला आणि तिच्या प्रियकराला व त्याच्या वडिलांना आत्महत्येस जबाबदार ठरवून आणि तशी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. त्या चिठ्ठीत पत्नीच्या प्रेमसंबंधांबाबत मुलीने माहिती दिली, असे म्हटले आहे. मुलीला आश्रमशाळेत त्यांचा एकत्र राहण्याचा बेत होता. हे वडिलांना सांगितल्यास दोघांनाही मारून टाकू, अशी धमकी मुलीला दिली होती, असेही चिठ्ठीत लिहिले आहे. या फिर्यादीवरून खेड पोलिसांनी तरुणाची पत्नी, तिचा प्रियकर आणि त्याचे वडील यांच्यावर गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com