राजगुरुनगरमध्ये जिवंत देखावा ठरला गणेशभक्तांचे आकर्षण

राजगुरुनगरमध्ये जिवंत देखावा ठरला गणेशभक्तांचे आकर्षण

Published on

राजगुरुनगर, ता. ७ : येथील गणपती  विसर्जन मिरवणूक शांततेत व जल्लोषात पार पडली. गणपती  विसर्जन मिरवणूक  सुमारे साडेसहा तास  चालली. शेवटच्या गणपतीचे  विसर्जन रात्री एकच्या सुमारास झाले. 
मिरवणूक  संध्याकाळी साडेसहा वाजता सुरु झाली. हुतात्मा राजगुरू, भगतसिंग, सुखदेव आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना माजी जिल्हा परिषद सदस्य अनिलबाबा राक्षे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हिरामण सातकर, पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण, राजगुरुनगर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांच्या हस्ते पुष्पहार घालून आणि मानाच्या मोती चौक  गणपतीपुढे श्रीफळ वाढवून मिरवणुकीला ढोल ताशांच्या गजरात सुरुवात झाली. मिरवणुकीत मोती चौक, माणिक चौक, आझाद चौक, नवयुग तरुण मंडळ (नेहरू चौक), गणेश चौक, क्रांतिवीर राजगुरू गणेशोत्सव मंडळ, हुतात्मा राजगुरू गणेशोत्सव मंडळ, सिद्धेश्वर चौक, भारतरत्न लालबहाद्दूर शास्त्री चौक गणेशोत्सव मंडळ, जुना मोटार स्टँड गणेश उत्सव मंडळ, सिद्धिविनायक गणेशोत्सव मंडळ, अहिल्यादेवी चौक, संत सावता महाराज गणेशोत्सव मंडळ, एकवीरा तरुण, सम्राट उत्कर्ष गणेश मंडळ (वडगादी चौक), सरदार चौक, योगेश्वर मित्र मंडळ  आदी मंडळाचे गणपती सहभागी झाले होते.
काही मंडळांपुढे ढोल-ताशा पथके होती. तसेच अनेकांनी साउंड बॉक्स लावले होते. एकवीरा गणेश मित्र मंडळाचा ‘सुख म्हणजे काय असतं’ हा जिवंत देखावा गणेशभक्तांचे आकर्षण ठरला.‌ विसर्जन मिरवणुकीत सहभागी नसलेल्या मंडळांनी दिवसभर व आदल्या दिवशी मिरवणुका काढून विसर्जन केले. दिवसभर घरगुती गणपतींचे मोठ्या उत्साहात लोकांनी विसर्जन केले. ११५० मूर्ती दान केल्या, तर ३ टन निर्माल्याचे संकलन झाल्याचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी सांगितले.‌

मिरवणूक नियोजनाची वैशिष्ट्ये
- नगरपरिषदेकडून गणेशविसर्जनसाठी नाव घाटाच्या कडेला व्यवस्था
- सर्वत्र लाईटची व पार्किंगचीही व्यवस्था
- घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी हौद
- निर्माल्य गोळा करण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉली
- मूर्ती दान करण्याचा उपक्रम राबविला.
- पोलिस अधिकाऱ्यांसह ६० पोलिस, एसआरपीएफची एक तुकडी, ५० होमगार्ड यांच्यासह २०० स्वयंसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com