पैसे वाटपाच्या संशयावरून भांडण, धमक्या, मारहाण

पैसे वाटपाच्या संशयावरून भांडण, धमक्या, मारहाण

Published on

राजगुरुनगर, ता. २९ : मतदारांना पैसे वाटप करत असल्याच्या संशयावरून भाजपच्या उमेदवाराने व कार्यकर्त्यांनी समोरच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची, तसेच त्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ, धमक्या दिल्याची घटना येथे शुक्रवारी (ता. २८) रात्री साडेअकरा वाजता घडली. दोन्हीही बाजूंनी परस्पर विरोधी तक्रारी खेड पोलिस ठाण्यात देण्यात आल्या असून दोन्ही बाजूंच्या संबंधितांवर बेकायदा जमाव जमवणे, सार्वजनिक शांततेचा भंग करणे, दंगा करणे, मारहाण करणे आदी आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साई विलास पिंगळे ( वय २०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिवाजी मांदळे, बुवा भालशिंगे, किरण चौधरी व आमीर मोमीन व इतर चार पाच जणांनी (सर्व रा. राजगुरुनगर) त्यांना व त्यांचा मित्र मोहित सुनील कदम यांना शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केली. रात्री साडेअकरा वाजता साई पिंगळे व मोहित कदम त्यांच्या कारमधून प्लॉटिंग पाहण्यासाठी तिन्हेवाडी रस्त्यावरील एका सोसायटीच्या रस्त्याने जात होते. तेव्हा ते मतदारांना पैसे वाटण्यासाठी जात आहेत, असा संशय आल्याने मांदळे व इतर तेथे आले आणि त्यांनी त्यांना हाताने मारहाण केली. शिवाजी मांदळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते त्यांच्या घरी जात असताना अचानक दोन मुले एका मोटारीतून खाली उतरली व त्यांना दमदाटी, शिवीगाळ करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी मोटारीमध्ये आणखी तिघेजण होते. त्यांनी त्यांना मारण्याचा व त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे कार्यकर्ते तेथे आल्यानंतर त्यांनी साई पिंगळे या तरुणास धरून ठेवले. त्यांच्या बरोबरचे चार लोक पळून गेले.‌ दोन्ही बाजूंच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com