खेडमध्ये एबी फॉर्म न मिळाल्याने इच्छुक नाराज
राजगुरुनगर, ता. २१ : खेड तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी एकूण ७७ अर्ज दाखल झाले आहेत, तर पंचायत समितीसाठी एकूण १६३ अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारीसाठीचे एबी फॉर्म देताना प्रमुख पक्षांची मोठी दमछाक झाली. ऐनवेळी अनेक उमेदवारांनी पक्ष बदलल्याचे समोर आले. तर दोन तीन महिने प्रचार करूनही एबी फॉर्म न मिळाल्याने अनेकांच्या पदरी निराशा आली.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांनी सर्व जागांवर उमेदवार दिले आहेत. तर भाजप व शिवसेनेही बहुतांश जागांवर उमेदवार दिले नाहीत. काही जणांना प्रमुख पक्षांची अचानक उमेदवारी मिळाली, तर काही जणांनी निवडणुकीअगोदर खूप कष्ट घेतले असतानाही त्यांना डावलले गेल्याचे दिसून आले. सर्वच पक्षांनी आर्थिक सक्षमता हा निकष लावल्याने निष्ठावंत उमेदवार हळहळताना पाहावयास मिळाले. पैसे घेऊन पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी दिल्याचे आरोपही काहीजणांनी केले. ज्यांना अपेक्षित पक्षाची उमेदवारी मिळाली नाही, त्यांना ऐनवेळी कमी मागणी असलेल्या पक्षाची उमेवारी घेतली. अर्ज भरण्याच्या मुदतीपर्यंत हा गोंधळ सुरू होता. निवडणुकीत फटका बसण्याच्या भीतीने धास्तावलेल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी नाराजांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू केले. तालुक्यात भाजप आणि शिवसेना युती होणार असल्याची चर्चा होती. पण भाजपने ७ गट आणि १२ गणांमध्ये उमेदवार दिले आहेत. जरी उमेदवार दिले असले तरी शिवसेनेबरोबर चर्चा करून अजूनही युतीच निर्णय होऊ शकतो, असे भाजप नेते राम गावडे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

