‘पुन्हा कशाला आपण 
बारामतीला जाणार?’

‘पुन्हा कशाला आपण बारामतीला जाणार?’

Published on

राजगुरुनगर, ता. २८ : नेहमी गजबजलेला राजगुरुनगरमधील मोहिते वाडा अजित पवार गेल्याची बातमी समजल्यावर सकाळी स्तब्ध झाला होता. कार्यकर्ते येत होते आणि सुन्नपणे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यासमोर बसत होते. कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यासाठी हजरजबाबी असलेले मोहितेही सुन्नावस्थेत होते. त्यांचा ऊर भरून आला होता. बोललो तर भावनावेग आवरणार नाही, असे त्यांची देहबोली सांगत होती. कोणीतरी सुचविल्यावर कार्यकर्त्यांसह ते अंगणात आले. तेथे मौन पाळून सर्वांनी श्रद्धांजली वाहिली. मोहिते यांच्या पत्नी सुरेखा मोहिते रडत होत्या. अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू होते.
श्रद्धांजलीआधी पत्रकारांनी दोन शब्द तरी बोला, अशी विनंती केली. त्यांनी नकार देत अरुण चांभारे यांच्याकडे बोट दाखवले. चांभारे यांनी रडतच श्रद्धांजली वाहिली. ‘आमचे दैवत गेले...आमची शक्ती गेली,’ एव्हढंच ते कसेबसे बोलले. त्यानंतर श्रद्धांजली झाली आणि मोहिते बारामतीला रवाना झाले.
मोहिते गेल्यानंतर काही कार्यकर्तेही गेले. काहीजण जावे की न जावे, अशा संभ्रमात होते. एकाने माजी सभापती सुरेश शिंदे यांना विचारले, ‘जायचेच का?’ ते म्हणाले, ‘हो...हे आता शेवटचेच. पुन्हा कशाला आपण बारामतीला जाणार?’ त्यांच्या उत्तराने सर्वांची मने हेलावून गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com