दुचाकीवरील महिलेचे
गंठन हिसकावले

दुचाकीवरील महिलेचे गंठन हिसकावले

Published on

राजगुरुनगर, ता. १४ : पुणे नाशिक महामार्गावरून येथील केंद्रीय कांदा लसूण संशोधन केंद्राजवळून दुचाकीवरून चाललेल्या दोन महिलांपैकी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठन ओरबाडून दोन चोरटे पसार झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती राजकुमार उबाळे (रा. चांडोली टोलनाका, ता. खेड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. उबाळे आणि त्यांची मैत्रीण कांचन ओव्हाळ या राजगुरुनगर येथून बाजार घेऊन दुचाकीवरून चांडोली टोल नाक्याकडे जात होत्या. ओव्हाळ स्कूटर चालवत होत्या. पुणे-नाशिक महामार्गावरील केंद्रीय कांदा लसूण संशोधन केंद्राजवळच्या सेवा रस्त्यावरून त्या जात असताना मागून एका लाल रंगाच्या मोटारसायकलवर दोन चोरटे आले. त्यांच्या स्कूटरच्या शेजारून पुढे जात असताना मागे बसलेल्या चोरट्याने उबाळे यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सुमारे दीड लाख किमतीचे सोन्याचे मिनी गंठन हिसका मारून तोडले आणि घेऊन वेगाने पुण्याच्या बाजूला पसार झाले. गाडी चालवणारा चोरटा अंगाने मजबूत, काळासावळा, निळसर रंगाचा शर्ट आणि काळी पँट घातलेला होता. तर मागे बसलेला चोरटा सावळ्या रंगाचा, पांढऱ्या पट्ट्यांचा टी-शर्ट आणि काळी पँट घातलेला होता, असे वर्णन त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com