

राजेंद्र सांडभोर ः सकाळ वृत्तसेवा
राजगुरुनगर, ता. ३० : राजगुरुनगर शहरासाठीच्या सुधारित पाणी योजनेचा उद्भव चासकमान धरण आहे. सध्या धरणात मुबलक साठा असल्याने टंचाईचा सामना करावा लागत नाही. परंतु वितरित झालेले पाणी पिण्यायोग्य असल्याच्या साशंकतेमुळे येथे विकतच्या पाण्यानेच तहान भागवावी लागत आहे.
केदारेश्वर बंधाऱ्यावरील जुन्या पाणी योजनेतून शहरातील काही भागात पाणी जाते. या वितरित केलेल्या पाण्यावर प्रकिया केली असली तरी ते पिण्याबाबत साशंक असल्याने नागरिक येथे विकतचे पाणी पिण्यासाठी वापरतात. तर योजनेच्या पाण्याचा वापरासाठी उपयोग केला जातो.
पूर्वीची बंद पडलेली कडूस प्रादेशिक योजना दुरुस्त करून राजगुरुनगरसाठी १८ कोटी अंदाजपत्रक असलेली सुधारित पाणीयोजना २०१८ मध्ये सुरू झाली. ती रखडत रखडत यावर्षी पूर्ण झाली. त्याचे पाणी आता राजगुरुनगरवासीयांना मिळू लागले आहे. पण त्याच्याही शुद्धतेविषयी खात्री नसल्याने नागरिक पिण्यासाठी विकतचे पाणी घेत आहेत.
नवीन योजनेच्या नळजोडांना नगर परिषदेने मीटर बसवले असून १ एप्रिलपासून नागरिकांना मीटरप्रमाणे पाणीपट्टी आकारण्यात येणार आहे. यापुढची पाणीपट्टी मीटरप्रमाणे भरावी लागणार आहे. सुमारे ७० टक्के नळजोडांना मीटर बसवून झाले आहेत. लवकरच सर्व नळजोडांना मीटर बसवले जातील, असे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ आणि पाणीपुरवठा विभाग प्रमुख अमन मोमीन यांनी सांगितले.
भविष्यात पाण्याच्या तरतुदीसाठी राजगुरुनगर नगरपरिषदेने सरकारकडे चासकमान धरणातून वाढीव पाणी मागितले आहे. तसेच वेताळे जलशुद्धीकरण प्रकल्पाचे नूतनीकरण करून त्याची क्षमता वाढवून दर्जा सुधारण्यात येईल. साधारण ६ महिन्यांनंतर नागरिकांना पिण्यासाठी विकत पाणी घ्यावे लागणार नाही.
- मंगेश गुंडाळ, नगराध्यक्ष, राजगुरुनगर
दृष्टिक्षेप
- शहराला पाणीपुरवठा करणारी योजना - कडूस प्रादेशिक योजना (चासकमान धरण)
- दररोजचा पाणीपुरवठा - ८ एमएलडी
- एकूण वॉर्डना पुरवठा - १०
- पाणी येण्याची वारंवारता - दररोज १ तास
सध्याची पाणीस्थिती (चासकमान धरण )
- एकूण क्षमता - ८.५३ टीएमसी
- आजचा साठा - १२१.२८ दशलक्षघनमीटर
- वापरण्यायोग्य पाणी - ९४ दशलक्षघनमीटर
- मृत साठा - २७.१९ दशलक्षघनमीटर
- दिवसाला पाणी उपसा (राजगुरुनगर साठी) - ९ एमएलडी
लोकसंख्या व गरज
- शहराची लोकसंख्या - अंदाजित सुमारे ६० हजार
- प्रति व्यक्ती पाण्याची गरज - १३५ लिटर
तुटवडा / समस्या
- सध्याची पाणीटंचाई - नाही
- गळती/पाणी नुकसान - २० टक्के
- अनियमित पुरवठा - चासकमान-वेताळे-कडूस रस्त्याच्या कामामध्ये जलवाहिनी फुटली तर अथवा वीजपुरवठा खंडित झाला तर.
- टँकरवर अवलंबित्व - नाही
पर्यायी व्यवस्था
- केदारेश्वर बंधारा - २ एमएलडी
- टँकरची संख्या - १
- बोअरवेल / विहिरींचा वापर - अंदाजे १० टक्के
पुढील अंदाज
- पाणीसाठा जून महिन्यापर्यंत पुरेल
- पावसावर अवलंबित्व - होय
- उन्हाळ्यातील धोका - धरणातील पाणीपातळी कमी झाल्यास एक दिवसाआड पाणी पुरवठा.
उपाययोजना
१) गळती रोखणे - जुन्या पीव्हीसी वाहिनी गळतीचे प्रमाण जास्त असल्याने नवीन एचडीपीई वर पाणी शिफ्ट करायचे काम चालू आहे.
२) पाणी बचत अभियान - अवैध जोड तोडण्यात येत आहेत.
३) नवीन धरण/योजना - सध्या नाही
४) पुनर्वापर - रेन वाटर हार्वेस्टिंगसाठी आवाहन करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.