

राजगुरुनगर, ता.२६ : ‘‘ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याची गरज असून, बदलत्या परिस्थितीनुसार शेतकऱ्यांनी आता गट पद्धतीने शेती करणे काळाची गरज आहे,’’ असे प्रतिपादन खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी खेड तालुक्यातील दावडी येथे केले.
येथे रामसुकृत कल्याण फाउंडेशनच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार कुलकर्णी यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला आमदार बाबाजी काळे, जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह शिंदे, दीप्ती भोगाडे, सभापती विद्या मोहिते, उपसभापती मंगेश सावंत, पंचायत समिती सदस्य प्रसाद घेणंद यांच्यासह दीपक घारे, संजय घारे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
कुलकर्णी पुढे म्हणाल्या की, दावडी येथील ग्रामस्थांचा सामाजिक दृष्टिकोन सकारात्मक असून अशाच विचारातून रचनात्मक काम उभे राहू शकते. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संभाजी घारे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. हे फाउंडेशन शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्य आणि शासकीय योजनांच्या माध्यमातून ग्रामीण समाजाला स्वावलंबी बनवण्यासाठी कार्यरत आहे. याकामी श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट, सत्य साई सेवा ट्रस्ट यांसारख्या संस्थांचे सहकार्य लाभत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
04316
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.