

राजगुरुनगर, ता. २४ : अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी, यासाठी राजगुरुनगर नगर परिषदेपुढे उपोषणास बसलेल्या पंकज गायकवाड आणि त्यांची पत्नी सविता यांनी नगरपरिषदेच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले.
नगरपरिषदेच्या सफाई कामगार सरिता एकनाथ गायकवाड यांचे ८ ऑगस्ट २०२१ रोजी निधन झाले. आईचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी आणि त्याबाबतचा प्रस्ताव नगरपरिषदेने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा, यासाठी पंकज गायकवाड आणि त्यांची पत्नी सविता यांनी राजगुरुनगर नगरपरिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ गुरुवारी उपोषण सुरू केले होते. शुक्रवारी या आंदोलनाची दखल नगरपरिषदेच्या वतीने घेण्यात आली. नगरपरिषदेचे शिष्टमंडळ उपोषणस्थळी आले व चर्चा झाली. त्यानंतर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत पंकज गायकवाड यांना तात्पुरत्या स्वरूपात करार तत्त्वावर कामावर घेण्याचा निर्णय घेतला. तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होताच त्यांच्या अनुकंपा नियुक्तीचा प्रस्ताव पुढे पाठविण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले. मुख्याधिकारी अंबादास गर्कळ व काही नगरसेवकही यावेळी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.