खेड तालुक्यातील तीन महाविद्यालये शंभर नंबरी

खेड तालुक्यातील तीन महाविद्यालये शंभर नंबरी
Published on

राजगुरुनगर, ता. ४ :  खेड तालुक्यातील बारावी परीक्षेचा निकाल ८९.६५ टक्के लागला आहे. बहुतेक सर्व विद्यालयांचा आणि महाविद्यालयांचा निकाल ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त लागला आहे. तालुक्यातील वाकी खुर्द येथील प्रियदर्शनी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कडूस येथील डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आणि राजगुरुनगर येथील ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या तीन महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. 
 तालुक्यातून या परीक्षेला ५३३६ विद्यार्थी बसले होते, त्यातील ४७८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
तालुक्यातील विद्यालय व महाविद्यालयानुसार निकाल पुढीलप्रमाणे कंसात टक्के ः हुतात्मा राजगुरू महाविद्यालय, राजगुरुनगर (८८.६६), कर्मवीर भाऊराव पाटील ज्युनिअर कॉलेज, वाडा (९१.४२), सीताबाई पाटोळे ज्युनिअर कॉलेज, चाकण (९४.१४), संत ज्ञानेश्वर विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज, आळंदी (९०.११), श्रीमंत महाराजा फत्तेसिंगराव गायकवाड विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज, दावडी (९०.४७), सुभाष माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, बहुळ (६६. ६६), रामभाऊ म्हाळगी विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज, कडूस (५५.१७), नवीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मरकळ (८९.३९), शिवाजी विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज, डेहणे (८१.६९), रामचंद्र पाटील औटी उच्च माध्यमिक विद्यालय, आळंदी (६०.५२), आर्टस अँड कॉमर्स ज्युनिअर कॉलेज, पाईट (९१.७५), महात्मा गांधी विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज, राजगुरुनगर (९९.४६), नवचैतन्य उच्च माध्यमिक विद्यालय, काळूस (७८.५७), श्री भामचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भांबोली (९०), उच्च माध्यमिक विद्यालय, वाशेरे (८८), श्री समर्थ माध्यमिक विद्यालय, चिंबळीफाटा (९४.४५), बी. एम. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बिरदवडी (८०), आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज, डेहणे (८१.४४), आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज, राजगुरुनगर (८२.६८), श्री समर्थ ज्युनिअर कॉलेज, नाणेकरवाडी (९३.०२ टक्के), ज्ञानवर्धिनी ज्युनिअर कॉलेज, खेड (७२.३४), मॉडर्न हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, भोसे (८६.६६), प्रियदर्शिनी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वाकी खुर्द (१००), श्री शिवाजी विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज, शेलपिंपळगाव (८१.६६), श्री संजयशेठ जैद पाटील विद्यावर्धिनी प्रशाला ॲंड ज्युनिअर कॉलेज, (९७.१८) डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कडूस (१००), स्व. भागूबाई पिंगळे विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज खेड (८१.२५) ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, राजगुरुनगर (१००), जयहिंद पब्लिक स्कूल ॲंड ज्युनिअर कॉलेज, खेड (९९.३४), गव्हर्नमेंट आयटीआय, खेड (९२.५९), आदिराज प्रायव्हेट आयटीआय, खेड (८१.८१), हुतात्मा राजगुरू महाविद्यालय (व्होकेशनल), राजगुरुनगर - (९३.६५), शिवाजी विद्यामंदिर अँड सीतामाई भिकोबाशेठ पाटोळे ज्युनिअर कॉलेज, चाकण (८८.७३ ).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com