खानवटे येथे राजेंद्र मेंगडे यांचा निरोप समारंभ

खानवटे येथे राजेंद्र मेंगडे यांचा निरोप समारंभ

Published on

राजेगाव, ता. ३ : खानवटे (ता. दौड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र बाबासाहेब मेंगडे यांची आंतरजिल्हा बदली अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यात झाल्याने त्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानवटे गावच्या सरपंच अनिता ढवळे होत्या. राजेंद्र मेंगडे यांनी ६ वर्ष अतिशय प्रामाणिकपणे सेवा केली. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन शाळेचा कायापालट केला. डोंबारी समाजाची शाळाबाह्य मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणली. म्हणून त्यांचा ग्रामस्थांच्यावतीने कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता.

यावेळी सरपंचपदी निवड झाल्याबद्दल अनिता ढवळे, खानवटे सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल लता ढवळे आणि गावातील युवक आसिफ मुलाणी याची मर्चंट नेव्हीमध्ये निवड झाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने सत्कार केला.

यावेळी खानवटे गावच्या माजी सरपंच अंजलीताई ढवळे, जयाताई खुटाळे, शंकर ढवळे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दीपक ढवळे, उपसरपंच अर्जुन गायकवाड, मेघा राजेभोसले, रंगनाथ ढवळे, पोलिस पाटील ऊर्मिला गायकवाड, केंद्र समन्वय अमजद पठाण, मुख्याध्यापक इंद्रभान गोसावी, हनुमंत पवार, भीमराव पवार, अंकुश माहूरकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा जयश्री चव्हाण, सदस्य प्रियांका लोखंडे, मयूरी यादव, संदीप पानसरे, मारुती ढवळे, राजेंद्र कन्हेरकर, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.