स्वामी चिंचोली येथील 
विकास कामांचे भूमिपूजन

स्वामी चिंचोली येथील विकास कामांचे भूमिपूजन

Published on

राजेगाव, ता. ४ : स्वामी चिंचोली (ता. दौंड) ग्रामपंचायतीच्यावतीने विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यामध्ये १५वा वित्त आयोग, जनसुविधा, दलित वस्ती सुधार योजना, सार्वजनिक बांधकाम विभाग या योजनेतून मंजूर झालेल्या अंतर्गत रस्ते, बंदिस्त गटार, संरक्षक भिंत, ब्लॉक बसविणे, सार्वजनिक शौचालय बांधणे अशा विविध कामांचे भूमिपूजन सरपंच पुनम मदने आणि उपसरपंच प्रकाश होले आणि मान्यवरांच्या हस्ते केले. यावेळी ग्रामसेविका स्वाती लोंढे, ग्रामपंचायत सदस्य धनाजी मत्रे, पद्माकर कांबळे, गजानन गुणवरे, मच्छिंद्र मदने, कर्मचारी महमद शेख, अविनाश कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते.
‘‘विकासकामांचा पाठपुरावा केल्यामुळे गावातील अनेक कामे मंजूर झाली आहेत. गावच्या विकासासाठी उपसरपंच, सर्व सदस्य आणि ग्रामस्थांचे सहकार्य मिळत आहे. भविष्यात गावाच्या विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन प्रयत्न केले जातील,’’ असे सरपंच पूनम मदने यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.