

राजेगाव, ता. ७ : रावणगाव (ता. दौंड) परिसरातील रानमळा शाळेचे शिक्षक राहुल किसन शिंदे यांना तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत प्रथम, तर स्वरचित कविता गायनमध्ये द्वितीय क्रमांक मिळाला आहे. वरवंड (ता. दौंड) येथे नुकतेच पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने शिक्षक सक्षमीकरण कला, क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन केले होते. तालुकास्तरावर प्रथम क्रमांक आल्यामुळे शिंदे यांची जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली होती. कोयाळी पुनर्वसन (ता. शिरूर) या ठिकाणी जिल्हास्तरीय स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्या हस्ते शिंदे यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. शिंदे हे गावोगावी जाऊन महापुरुषांच्या जीवनावर व्याख्याने देऊन समाजप्रबोधन करतात. तसेच वारकरी संप्रदायातील कीर्तन, प्रवचनही करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.