राजेगावला हरिनाम सप्ताहाची सांगता
राजेगाव, ता. २५ : राजेगाव (ता. दौंड) येथील ग्रामदैवत राजेश्वराचा भंडारा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नामांकित कीर्तनकरांनी सेवा बजावली. भंडाऱ्यासाठी ग्रामस्थांनी चौदा लाख रुपयांची वर्गणी जमा करून योगदान दिले.
पावसाचा व्यत्यय येऊ नये म्हणून ११० × १२० आकाराचे पत्र्याचे शेड आणि मंडप टाकला होता. मंदिरावर विद्युत रोषणाई केली होती. भंडारा यशस्वी होण्यासाठी राजेश्वर सेवा प्रतिष्ठान भंडारा कमिटीने प्रयत्न केले.
राजेगाव (ता. दौंड) या गावाला वार्षिक यात्रा साजरी केली जात नाही. त्यामुळे दरवर्षी भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला होणारा राजेश्वराचा भंडारा हाच उत्सव ग्रामोत्सव म्हणून उत्साहात साजरा केला जातो. परगावी असलेले नागरिक, सासरी गेलेल्या मुली, पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते. यंदा सप्ताहाचे ४३ वे वर्ष होते. या काळात मधुकर जगदाळे, तुषार मोरे, सुनील डंगाणे, विठ्ठल पासलकर, माणिक काटकर, अशोक वाघ, हरिश्चंद्र शिंदे यांची प्रवचने झाली. तर प्रकाश साठे, अनिल देवळेकर, अर्जुन मोटे, उमेश दशरथे, रोहिणी परांजपे, पंकज गावडे, पांडुरंग गिरी यांची कीर्तने झाली.
रविवार (ता. २४) माधव रसाळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. दुपारी १२ वाजता गोविंद महाराज गायकवाड यांचा भारुडाचा कार्यक्रम झाला. भजनसम्राट अभिमन्यू पांचाळ, देविदास पावडे आणि मृदृंगाचार्य कृष्णा बोरकडे यांची साथसंगत मिळाली. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रमेश थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन दोरगे, माजी अध्यक्ष उत्तमराव आटोळे, प्रकाश नवले उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.