उसाच्या विक्रमी उत्पादनाचा ‘एआय’मुळे वाढला गोडवा
खुटबाव, ता.२६ : खुटबाव (ता. दौंड) येथील उच्चशिक्षित स्थापत्य अभियंता शेतकरी महेंद्र थोरात यांनी दौंड तालुक्यामध्ये प्रथमच आपल्या ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान वापरत दीड एकर क्षेत्रामध्ये १५ महिने पूर्ण वाढ झालेल्या उसाचे १४२ टन उत्पादन घेतले आहे. त्यामुळे थोरात यांना एकरी सरासरी ९५ टन उत्पादन मिळाले आहे. एका उसाला ४० ते ४२ कांड्या आहेत.
थोरात यांचा ऊस दौंड शुगर कारखान्याला गेला असून, एआय तंत्रज्ञानाचे तालुक्यामध्ये पहिलेच उत्पादन असल्याने परिसरातून थोरात यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. एआय प्रणालीमुळे शेतीमध्ये उभारलेल्या टॉवरद्वारे ऊसकिड नियंत्रण, खताची मात्रा, हवामानाचा अंदाज, जमिनीवर पडणारा सूर्यप्रकाश या सर्व गोष्टींचा घरबसल्या मोबाईलवर अंदाज घेता येतो.
बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार यांच्या पुढाकारातून हा राज्यस्तरीय प्रकल्प राबवण्यात आला आहे. सुरुवातीस कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील १००० शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये ‘सेंटर फॉर एक्सलन्स फार्म व्हाईब्ज’ हा प्रयोग राबला आहे. त्यामध्ये दौंडमधील थोरात यांची निवड झाली. ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संचालक डॉ.अजित जावकर, मायक्रोसॉफ्टचे संचालक डॉ. रणवीर चंद्रा यांनी यासाठी सहकार्य केले आहे.
आगामी काळामध्ये महाराष्ट्रातील ५० हजार शेतकऱ्यापर्यंत ए.आय. प्रणाली पोहोचवण्याचे नियोजन आहे.या तंत्रज्ञानामध्ये रासायनिक खतांचा कमी वापर करून जास्तीत जास्त जैविक खतांचा वापर करतात.
कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचे फायदे
- वाऱ्याची दिशा व वेग मोजणे. त्यावरून औषध फवारणी व्यवस्थापन करता येते.
- पिकाला सूर्यप्रकाश किती मिळाला. पानांवर आर्द्रता किती आहे ते समजते.
- पावसाचा अचूक अंदाज घेणे. पाऊस किती पडला त्याचे मोजमाप समजते.
- जमिनीचे तापमान ठरविणे. त्यावरून पाणी किती पाहिजे ते ठरविता येते. पाणी जास्त झाल्यास तत्काळ मेसेज येतो.
- जमिनीतील खताची गरज नत्र, फॉस्परस, पोटॅश ओळखते व सुधारण्यास मदत करते.
एआय तंत्रज्ञानाचा पहिलाच प्रयोग असल्याने चालू वर्षी समाधानकारक उत्पादन घेऊ शकलो. एका उसाला ४० ते ४२ कांड्या आल्या होत्या. यावर्षी तालुक्यात ४०० मिलिमीटर पाऊस पडला. सरासरी पेक्षा कितीतरी पट जास्त पाऊस पडल्याने थोडेसे ऊत उत्पादन कमी मिळाले. पुढील वर्षी ए आय तंत्रज्ञानापासून एकरी १२५ उत्पादन घेण्याचा मानस आहे.
- महेंद्र थोरात, ऊस उत्पादक
01529
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

