राजेगावमध्ये मुळा- मुठा कालव्याच्या चारीची दुरवस्था

राजेगावमध्ये मुळा- मुठा कालव्याच्या चारीची दुरवस्था

Published on

राजेगाव, ता. ११ ः राजेगाव (ता. दौंड) परिसरातील शेतीसाठी महत्त्वाच्या असलेल्या मुळा- मुठा कालव्यांतर्गत येणाऱ्या चिपाडेवस्ती चारीची दुरवस्था झाली आहे. प्रशासकीय दुर्लक्ष आणि नियोजनाच्या अभावामुळे या चारीवरील शेवटच्या टोकाच्या शेतकऱ्यांना थेंबभरही पाणी मिळत नसल्याने पिके जळून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चिपाडेवस्ती चारीची गेल्या अनेक वर्षांपासून साफसफाई झालेली नाही. चारीमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचला असून, वाढलेल्या झाडा-झुडपांमुळे पाण्याचा प्रवाहाला अडथळा निर्माण होत आहे. त्यातच काही शेतकऱ्यांनी चारीमध्ये अनधिकृतपणे अडथळे निर्माण करून तसेच चारी फोडून आपल्या सोयीनुसार पाणी वळविले आहे. यामुळे पाण्याचे समान वाटप होत नसून, ज्या शेतकऱ्यांची शेती चारीच्या शेवटच्या टोकाला आहे, त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचतच नाही.
पाणी मिळत नसल्याने या भागातील पिके जळून जाण्याची शक्यता आहे. हक्काचे पाणी असूनही नियोजनाअभावी ते मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. वरच्या भागातील शेतकरी पाणी अडवतात आणि चारीच्या दुरवस्थेमुळे पाणी पुढे सरकत नाही. अशा परिस्थितीत आम्ही जगायचे कसे? असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. पाटबंधारे विभागाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.

चाऱ्याची साफसफाई केली तर टेलपर्यंतच्या शेतकऱ्यांना पाणी सुरळीत मिळेल. पुढील आवर्तन येण्याआधी ही चारी साफ करण्यात यावी. जर पाटबंधारे विभागाने तातडीने लक्ष दिले नाही, तर मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.
- भाऊसाहेब मोघे, स्थानिक शेतकरी, राजेगाव

01602

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com