ब्राईट फ्युचर स्कूलचा वर्धापनदिन उत्साहात

ब्राईट फ्युचर स्कूलचा वर्धापनदिन उत्साहात

Published on

राजेगाव, ता. १३ : खडकी (ता. दौंड) येथील ज्ञानसागर बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचलित ब्राईट फ्युचर स्कूलचा सातवा वर्धापनदिन विविध उपक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. तर मुलींनी सादर केलेला नृत्याविष्कार, छत्रपती शिवाजी महाराज व अफजलखान भेट पोवाडा, तसेच लेझीम नृत्य विशेष आकर्षण ठरले. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात स्कॉलरशिप, डीटीएसइ, होमी भाभा, मंथन या परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या आणि खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यानंतर वैशाली बालगुडे यांनी प्रास्ताविकातून संस्थेचा २०१९ पासूनचा प्रवास व मिळवलेले यश याबद्दल सांगितले. रमा जनावली यांनी कविता सादर केली. तसेच दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभही पार पडला.
व्याख्याते व कौन्सिलर सारिका पाटील आणि अॕड. बापूराव भागवत यांनी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण, शिस्त, मेहनत आणि जीवनातील मूल्यांचे महत्त्व विशद केले. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयाकडे आत्मविश्वासाने वाटचाल करावी असा मौल्यवान सल्ला दिला. यावेळी देविदास गायकवाड, बारामतीचे नायब तहसीलदार दीपक कोकरे, जयसिंग कदम, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजू गायकवाड, संचालिका रोहिणी गायकवाड, खजिनदार तुषार काळे, उपाध्यक्ष तेजस गायकवाड, सचिव ऋषिकेश गायकवाड, मुख्याध्यापिका शीतल काळभोर, उपमुख्याध्यापक योगेश हगारे आणि पालक वर्ग, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. मुख्याध्यापिका शीतल काळभोर यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा नेहमीच प्रयत्नशील असल्याचेही सांगितले. जयसिंग कदम यांनीही आपल्या मनोगतातून संस्कारयुक्त शिक्षण व समाजोपयोगी कार्याचे महत्त्व सांगून शिक्षणातूनच सुसंस्कृत व सक्षम पिढी घडते, असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा होले व वैशाली बालगुडे यांनी केले.

शाळेच्या उभारणीत शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे व गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचा संस्थेचा संकल्प आहे.
- राजू गायकवाड, अध्यक्ष, ज्ञानसागर बहुउद्देशीय सामाजिक संस्था

1611

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com