विजेअभावी पिके जळाल्याने शेतकरी संतप्त
राजेगाव, ता.२३ : मलठण (ता. दौंड) येथील फिडरवरून वाटलूज नायगाव आणि राजेगावला वीजपुरवठा होणाऱ्या मार्गात केबल टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे वाटलूज परिसरात फक्त चारच तास रात्रीच्या वेळी वीजपुरवठा होत आहे. परिणामी पिके विजेअभावी जळू लागल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
विजे अभावी पाणी न दिल्याने ऊस, कांदा, मका, गहू यांसह जनावरांची चारा पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे जोपर्यंत महावितरण नवीन म्हसोबा वीजवाहिनीचे काम पूर्ण करून आठ तास पुरवठा सुरळीत करत नाही. तोपर्यंत नायगाव फाटा व म्हसोबा फाटाचा वीजपुरवठा विभागातून दिवसा आठ व रात्री आठ तास असा सुरू करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. तातडीने वीजपुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलनाचा इशारा मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, मलठण उपकेंद्र येथून नवीन ११ केव्ही म्हसोबा फिडरचे अपूर्ण काम त्वरित पूर्ण करून पूर्ण दाबाने वीज पुरवठा सुरू ठेवण्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.
मलठण सबस्टेशन परिसरातच रस्त्यामधील लाइन क्रॉसिंगचे काम अपुरे असल्याने दरवर्षी अशीच परिस्थिती उद्भवते. संबंधित ठेकेदार याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आंदोलनावेळी तातडीने काम करू, असे म्हणत वारंवार उडवा उडवीची उत्तरे देतात. पाणी असतानाही चार तासच वीजपुरवठा होत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. दिवसपाळीत अतिरिक्त भार आल्याने अनेकदा विजेचा लपंडाव सुरू होतो. यामुळे पिकांना पाणी देण्यास अडचण निर्माण होत आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
मलठण परिसरात मोठ्या प्रमाणावर भारनियमन केले जात असल्याने शेतीसाठी चारच तासच वीज मिळते. त्यातही विजेची ये-जा चालूच राहते. या भागातील शेतीची अवस्था विजेअभावी उन्हाळ्यामध्ये दरवर्षीच चिंताजनक होते. महावितरण कंपनीचे अधिकारी व ठेकेदार यांच्या हलगर्जीपणाने मागील तीन वर्षांपासून शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडून जात आहे.
- योगेश थोरात, युवा शेतकरी नायगाव
मलठण गावात रखडलेले काम सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. वरिष्ठ कार्यालयाकडे वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी परवानगी मागितली आहे. परवानगी मिळाली कि, वीजपुरवठा सुरळीत केला जाईल. मलठणचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी ८-१० दिवस लागतील.
- सुजित ननवरे, उपकार्यकारी अभियंता दौंड उपविभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

