बोरीबेलला पंजाबी ड्रेस शिवणकाम प्रशिक्षण
राजेगाव, ता. १३ : बोरीबेल (ता. दौंड) येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी पंजाबी ड्रेस शिवणकाम प्रशिक्षण कोर्स उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दिलासा मायक्रो फायनान्स फाउंडेशन दौंड व बी. बी. डी इंडिया प्रा. ली. पुणे यांच्या वतीने हा उपक्रम सुरू केला आहे.
उद्घाटन बोरीबेलच्या माजी सरपंच भाग्यश्री पाचपुते यांच्या हस्ते केले. यावेळी संस्थेच्या वतीने महिलांचा सन्मान केला. यावेळी सरपंच नंदकुमार पाचपुते, अध्यक्ष अंकुश गावडे, विनोद जगताप, कल्याण पाचपुते, ग्रा. पं. सदस्य मधुकर पाचपुते, नितीन खोशे, राजेंद्र सूर्यवंशी, चंद्रकांत पाचपुते, दशरथ पाचपुते, संजय आटोळे आदी उपस्थित होते. दिलासा फाउंडेशनचे अध्यक्ष कैलास चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. दिलासाचे संचालक मनोहर इंगवले यांनी आभार व स्वागत केले.
‘‘महिला सक्षमीकरण होण्याच्या दृष्टीने संस्थेच्या वतीने व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येत असून यामध्ये गावातील व परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे,’’ असे आवाहन अध्यक्ष चव्हाण यांनी यावेळी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

