

राजेगाव, ता. १५ ः रावणगाव (ता. दौंड) परिसरातील रानमळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सन २०२५-२६चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. शालेय प्रांगणात आयोजित केलेल्या या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर केला.
कार्यक्रमाची सुरुवात सरपंच निर्मला आटोळे यांच्या हस्ते ईशस्तवन आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस कार्यक्रम सादर केले. यामध्ये प्रामुख्याने बालगीते व मधुर गीते सादर केली.
‘भारत माता की जय’च्या घोषणांनी आणि देशभक्तिपर गीतांनी परिसर भारावून गेला. गोंधळ गीत, दिंडी गीत आणि समाजप्रबोधनपर गीतांमधून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले. मुलांनी सादर केलेल्या विनोदी आणि बोधप्रद नाटिकांनी प्रेक्षकांना हसवत विचार करायला लावले, तर ''हॉरर'' गीताने कार्यक्रमात एक वेगळीच रंगत आणली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक राहुल शिंदे आणि शरद मोटे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला अंगणवाडी कर्मचारी, परिसरातील शिक्षणप्रेमी नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी परिवहन अधिकारी दत्तात्रेय गाढवे, माजी सरपंच शोभा गावडे, सुनीता गाढवे, तात्याराम आटोळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राहुल आटोळे, उपाध्यक्ष सीमा कोकणे, सचिन आटोळे, शहाजी आटोळे, हनुमंत आटोळे, बापू आटोळे, स्वप्निल गौंड आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.