मलठण परिसरातील शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
राजेगाव, ता. २२ : मलठण (ता. दौंड) येथील चव्हाणफार्म येथे दिलासा मायक्रो फायनान्स फाउंडेशन आणि बी. बी. डी. इंडियातर्फे जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महिलांना विणकाम प्रशिक्षण प्रमाणपत्रेही प्रदान करण्यात आली.
जे. बी. भावे अँड कंपनीचे सेक्रेटरी जयवंत भावे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी देवकातेवस्ती, खोमणेवस्ती, राजेगाव फार्म, शिंग्रोबामाळ, खानवटे, माळवाडी, मलठण स्टेशन अंगणवाडी आणि स्थानिक माध्यमिक विद्यालयांना वॉटर फिल्टर, झोके, साउंड सिस्टम, प्रिंटर, टेबल आणि कपाट यांसारख्या आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील यशाबद्दल खुशी कुशवाह, प्रतीक पाचपुते, कृष्णा माने, समृद्धी फराटे, अश्विनी काळे, अजय सांगळे, कृष्णा खळदे आणि सूरज वाघमोडे यांचा सन्मान करण्यात आला. आरी वर्क प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांनाही गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला ध्रुव भोमे, ऋतिक भिड, ॲड. रमाकांत प्रभुणे, ॲड. नितीन अवचट यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष कैलास चव्हाण व मनोहर इंगवले यांनी केले, तर उपस्थितांनी दिलासा फाउंडेशनचे आभार मानले.
01683
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

