उरळगाव येथे गणपती मंदिराची प्राणप्रतिष्ठा

उरळगाव येथे गणपती मंदिराची प्राणप्रतिष्ठा

रांजणगाव सांडस, ता. २९ : उरळगाव (ता. शिरूर) येथील शिवशक्ती तरुण मंडळाच्यावतीने आमदार ॲड.अशोक पवार यांच्या आमदार फंडातून, उद्योजक प्रकाशशेठ धारिवाल व लोकसहभातून उभारलेल्या गणपती मंदिराचे कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली.


स्वामी कैलासगिरीजी महाराज यांच्या हस्ते कलशारोहण व प्राणप्रतिष्ठा केली. यावेळी कीर्तनकार पारस महाराज मुथा यांचे कीर्तन झाले. गणेश मूर्तीची गावांमधून मिरवणूक काढून गावातील तरुण वर्गासह महिला आणि ग्रामस्थ यामध्ये सहभागी झाले होते. सलग दोन दिवस चाललेल्या विधीचे सतीश काजळकर, दादासाहेब पोपळघट व त्यांचे सहकारी यांनी पौरोहित्य केले.

यावेळी माजी सरपंच सुनील सात्रस, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रशांत सात्रस, जिल्हा परिषद सदस्य रेखाताई बांदल, राहुल करपे, हनुमंत काळे, राजू जाधव, माजी उपसरपंच राजेंद्र गिरमकर यांच्या हस्ते झाला. माजी उपसरपंच शशिकांत कोकडे, माजी सरपंच गजानन जांभळकर, नीलेश पोपळघट, अक्षय मुथा, गोवर्धन घायतडक, तुळशीदास नवले, निळोबा नवले, प्रल्हाद नवले, प्रमोद गिरमकर, अभय ताथेड, पप्पू वायदंडे, किरण माने, अनुराग कोकडे, सागर कोकडे, सागर पोपळघट यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकडे व रघुनाथ बेनके यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com