रांजणगाव सांडस येथील 
उपोषण आश्वासनानंतर मागे

रांजणगाव सांडस येथील उपोषण आश्वासनानंतर मागे

Published on

रांजणगाव सांडस, ता. ३ ः रांजणगाव सांडस (ता.शिरूर) येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर दारुबंदीसह विविध मागण्यांसाठी कविता मनोज रणदिवे व रूपाली संभाजी काळभोर यांनी सुरू केलेल्या उपोषणाला प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेतले.
रांजणगाव सांडस ग्रामपंचायत हद्दीतील सर्व अवैद्य दारूभट्ट्या कायमस्वरूपी बंद करावा, पीडित महिला त्यांच्या पतीला व्यसनमुक्ती केंद्रात टाकण्यासाठी प्रशासनाने सर्व खर्च द्यावा, पीडित महिलांच्या मुलांना संपूर्ण शिक्षणाचा खर्च प्रशासनाने करावा, पीडित महिलेला घर खर्च चालवण्यासाठी लघुउद्योग सुरू करून द्यावा, पिढीत महिलाने उपोषणानंतर भविष्यात त्यांच्या जिवाला काही बर वाईट झाल्यास त्वरित दारू विक्रेत्यांच्यावर कारवाई करावी, शाळेच्या परिसरात कमीत कमी १०० मीटर मध्ये अवैध धंदे बंद व्हावेत, दारुबंदी करत असताना पीडित महिलांना वेळोवेळी पोलिस प्रोटेक्शन द्यावे, आदी मागण्या करिता कविता रणदिवे व रूपाली काळभोर या बुधवारी (ता.३) ग्रामपंचायत कार्यालय समोर उपोषणाला बसल्या होत्या. त्याला गावातील महिला व ग्रामस्थ, किसान युवा क्रांती संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आदींनी पाठिंबा दर्शवला होता. याची दखल घेऊन पुणे येथील राज्य उत्पादन शुल्कजी विभाग यांचे निरीक्षक, शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार व ग्रामपंचायत कार्यालयाने लेखी आश्वासन दिले.त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले

असे दिले आश्वासन
दारू भट्ट्या व दारू विक्रेते यांच्यावर कारवाई करून, दारू पिऊन कुटुंबाला किंवा रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या त्रास दिल्यास कारवाई करू, उपोषणकर्त्या महिलांना भविष्यात पोलिस प्रोटेक्शन देऊ. महाराष्ट्र राज्य दारूबंदी अधिनियम १९४९ गंभीर स्वरूपाची कारवाई करून, यापूर्वी गुन्हे केलेल्या व भविष्यात गुन्हे करणाऱ्या व्यक्तीवर कलम ९३ व एम. पी. डी. ए. १९८१ च्या कायद्यानुसार कारवाईची तजवीज केरू. असे लेखी आश्वासन देण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.