आलेगाव पागा भागात सर्जा-राजाला नैवैद्य

आलेगाव पागा भागात सर्जा-राजाला नैवैद्य
Published on

रांजणगाव सांडस, ता.२ शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील रांजणगाव सांडस, आलेगाव पागा, उरळगाव ,दहिवडी, पारोडी, आरणगाव, शिवतक्रार म्हाळुंगी आदि गावात बुधवारी(ता.२) बैल पोळ्याचा सण पारंपरिक धार्मिक विधी व पाऊस समाधानकारक झाल्याने शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून उत्साहात भाद्रपती पोळा साजरा करण्यात आला. शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात परंपरेनुसार अनेक गावात बैलजोडीची आकर्षक सजावट करून, मिरवणूक काढून ,नैवेद्य दाखवत तर काही ठिकाणी सायंकाळी मानाच्या बैलाने ग्रामदैवतासह इतर दैवताची प्रथम फेरा घालून शेतकरी व गावकऱ्यांनी हा सण साजरा केला.काहीं शेतकऱ्यांनी गावातील ग्रामदेवतेसह इतर देवतेकडे जाऊन तर काही शेतकऱ्यांनी शेतातच किंवा घराशेजारीच पूजाविधी करून बैलपोळा सण साजरा केला .
02695

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com