उरळगाव येथून पूरग्रस्तांना किराणा साहित्य
रांजणगाव सांडस, ता. ९ : उरळगाव (ता. शिरूर) येथील जगदंबा प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या वतीने मराठवाडा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील देवी निमगाव, पिंपरी, धामणगाव आदी गावांना किराणा साहित्याचे कीट तयार करून बुधवारी (ता. ८) प्रत्यक्ष जाऊन या साहित्याचे वाटप केले.
मराठवाड्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर असून, ऊसतोड कामगारांच्या शेती व घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तूंची तातडीची गरज होती. त्यामुळे जगदंब प्रतिष्ठानने हा उपक्रम राबवला. यावेळी ३० किलो वजनाचे एक किराणा कीट तयार केले होते. त्यामध्ये बेसन पीठ, चहा पावडर, पीठ, तूरडाळ, साबण, पोहा, तांदूळ, मीठ, रवा, साखर, हळद पावडर, मिरची पावडर व गोडेतेल आदी वस्तूंचा समावेश आहे. प्रत्यक्ष देवी निमगाव, पिंपरी, धामणगाव आदी गावातील पूरग्रस्तांना ही मदत प्रत्यक्ष घरोघरी जाऊन दिली. तंटामुक्तीचे अध्यक्ष कैलास सात्रस, डॉ. रामदास पंदरकर, माजी उपसरपंच संदीप सात्रस, सोसायटीचे माजी अध्यक्ष संतोष सात्रस, सोमनाथ बांडे, श्रेयश आफळे, योगेश सात्रस आदी कार्यकर्त्यांनी आष्टी तालुक्यातील गावात घरोघरी प्रत्यक्ष जाऊन मदत केली.
महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम
जगदंबा प्रतिष्ठानच्या वतीने गावच्या सांस्कृतिक वैभवात भर घालण्यासाठी महिलांमधील सुप्त गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने महिलांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे सोमवारी (ता. ६) आयोजन केले होते. त्यामुळे घरकामात राबणारे महिलांचे हात होम मिनिस्टर खेळण्यात रंगले होते.
विविध स्पर्धा, डान्स आदींच्या माध्यमातून रंगलेल्या या स्पर्धेत सीमा तुकाराम गिरमकर या होम मिनिस्टरच्या महाविजेत्या ठरल्या. त्यांना जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य रेखाताई बांदल यांच्या हस्ते पैठणी व बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
03049
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.