भीमाशंकर येथे महाशिवरात्रीसाठी प्रशासन सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भीमाशंकर येथे महाशिवरात्रीसाठी प्रशासन सज्ज
भीमाशंकर येथे महाशिवरात्रीसाठी प्रशासन सज्ज

भीमाशंकर येथे महाशिवरात्रीसाठी प्रशासन सज्ज

sakal_logo
By

शिनोली, ता.१६: श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्री उत्सवांसाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
महाशिवरात्रीमुळे भाविक दोन दिवस आधीच मुक्कामी येत असतात. त्यात शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे भाविक मोठ्या संख्येने येणार आहेत. भक्त निवास व इतर ठिकाणी भाविकांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे. मंदिर व परिसरात बेरीकटिंग, सजावट व रंगरंगोटी पूर्ण झालेली आहे. वाहनतळ ते भीमाशंकर बस स्थानकापर्यंत मिनी बसची व्यवस्था केली आहे. दर्शन बारीसह मुखदर्शन व पासची सुविधा भाविकांना देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आलेली आहे व भीमाशंकर मंदिर परिसरात घोडेगाव व खेड पोलिस ठाणे अंतर्गत पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी, होमगार्ड असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
साखळी चोर व पाकिटमार करणारे व छेडछाड करणाऱ्या व्यक्ती यांच्यावर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे व चित्रीकरण करणारे पथके नेमण्यात आलेली आहे.
भीमाशंकर महाशिवरात्री यात्रा सुरळीत व शांततेत व्हावी यासाठी भाविक पर्यटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रांत अधिकारी सारंग कोडेलकर यांनी केले आहे. यात्रा काळात भाविक व पर्यटक यांना सुविधा पुरविण्यात येणार असल्याने असल्याचे भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे यांनी सांगितले आहे.

वाहनतळाची सहा किलोमीटर अलीकडेच व्यवस्था
भीमाशंकरपासून अलीकडे सहा किलोमीटर अंतरावर टेम्पो मिनी बस व मोठ्या वाहनांसाठी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. चार चाकी छोट्या गाड्यांसाठी वाहन क्रमांक तीन व चार येथे व्यवस्था करण्यात आली आहे. वाहन तळ क्रमांक दोन मध्ये मोटर सायकलची व्यवस्था केलेली आहे .