इंदापूर शहराचा चेहरामोहरा बदलणार

इंदापूर शहराचा चेहरामोहरा बदलणार
Published on

इंदापूर, ता. ६ : ‘‘कोणतेही पद किंवा मिळालेली संधी हे मिरवण्यासाठी नसून, सर्वसामान्य गोरगरीब जनतेची कामे करण्यासाठी असते. त्यानुसार लोकांनी ज्या विश्वासाने मला खुर्चीवर बसवले आहे, त्या विश्वासाला पात्र राहत येणाऱ्या दोन वर्षात शहराचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय स्वस्त बसणार नाही,’’ अशी ग्वाही माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली.
इंदापूर शहरातील बाब्रस मळा येथे विविध विकास कामाचे लोकार्पण व भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ, सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने, माजी उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे, सुरेश गवळी, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, विनायक बाब्रस, बाळासाहेब व्यवहारे, राजेंद्र चौगुले, विरोधी पक्षनेता पोपट शिंदे, एकनाथ गारदी, निखिल बाब्रस, पोपट जगताप, दत्तात्रेय घोगरे, अजित शेंडगे, प्रशांत शिंदे, अहमदराजा सय्यद, किसन शेंडे, बाळू म्हेत्रे, संजय शिंदे, सौरभ शिंदे, अनिकेत वाघ, गजानन गवळी, अमर गाडे, हरिदास हराळे, वसंतराव माळुंजकर, स्वप्नील मखरे, सुभाष खरे, रामदास चौगुले, मनोज पवार, सचिन चौगुले, गणपत गवळी आदी उपस्थित होते.
भरणे म्हणाले, ‘‘सन २०१४ पूर्वीचे इंदापूर आणि आताचे इंदापूर यामध्ये किती फरक झाला आहे, याचा विचार इंदापूरच्या जनतेने करावा आणि खरं कोण आणि खोटं कोण, हे ओळखावे.’’ गारटकर म्हणाले, ‘‘शहराच्या वाढीव भागात विकास कामे करण्यासाठी भरणे यांनी आपल्याला मिळालेल्या मंत्रिपदाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने शहराचा समतोल विकास साधला जात आहे.’’
या कार्यक्रमाचे नियोजन मनोज भापकर, अनिल चव्हाण, समीर दुधनकर, रमेश बनसोडे, बापू भिसे, संतोष काळे, प्रवीण शिंदे यांनी केले. श्रीधर बाब्रस यांनी प्रास्ताविक; तर सुनील मोहिते यांनी सूत्रसंचालन केले.

‘बोर्ड लावून विकास होत नसतो’
भरणे म्हणाले, ‘‘विरोधकांना गप्पा मारू द्या, आपल्याला विकास कामे करू द्या. चौकाचौकात बोर्ड लावून विकास होत नसतो, लोकांचे प्रश्न सुटत नसतात. त्यासाठी काम करावे लागते. केंद्रात आणि राज्यात सरकार नसले; तरी तालुक्याचा आमदार मीच आहे आणि मी पण पवारांचा पठ्ठ्या असल्याने निधी कसा आणायचा, हे मला कुणी सांगायची गरज नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com