शिर्सुफळ येथे बेकायदा मुरूम उपसा
शिर्सुफळ येथे बेकादा मुरूम उपसा

शिर्सुफळ येथे बेकायदा मुरूम उपसा शिर्सुफळ येथे बेकादा मुरूम उपसा

Published on

शिर्सुफळ, ता : ८ : शिर्सुफळ (ता. बारामती) येथील खंडोबानगरच्या लगत असणाऱ्या गायरान क्षेत्रातील नाल्यांमधून मध्यरात्री बेकायदेशीररीत्या मुरूम उपसा केला जात आहे.
दिवसभर ग्रामस्थांची वर्दळ असल्याने रात्रीच्या वेळी गायरान जमिनीतील अज्ञातांनी मुरूम बेकायदेशीररीत्या चोरून नेण्याचा सपाटा लावला आहे. या मुरूम उपशाकडे ग्रामपंचायत तसेच महसूल विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामस्थ बोलत आहेत. बेकायदा मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन करून त्याव्दारे लाखो रुपये कमावले जात आहेत. या मुरूम उपशाची चौकशी करून कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामपंचायतीने असा मुरूम उपसा करण्यासाठी कोणालाही परवानगी दिलेली नाही. मुरूम उपसा केलेल्या ठिकाणची पाहणी करून पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करणार आहोत. असे शिर्सुफळचे सरपंच अप्पासाहेब आटोळे यांनी सांगितले.

02971

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com