इंदापुरात आयोजन : पारंपरिक कलांचे सादरीकरण
शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

इंदापुरात आयोजन : पारंपरिक कलांचे सादरीकरण शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

इंदापूर, ता. २२ : अक्षय्य तृतीया तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे साजरी होणारी जयंती इंदापूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी सजविलेले उंट, घोडे, हलगीवादन, संबळ, आराधी, पोतराज, गजढोल पथक, मुलांचा मल्लखांब, बँजो आणि डीजेचा दणदणाट होता. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

येथील श्री छत्रपती शिवाजी मित्रमंडळ व शिवप्रतिष्ठान खडकपुरा यांच्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सवानिमित्त सकाळी शहरातील श्री. तुळजाभवानी माता मंदिर येथे अभिषेक करण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक खडकपुरा, बाबा चौक, जुना पुणे-सोलापूर मार्ग, ४० फुटी रस्ता, दर्गा मस्जिद चौक, नेहरू चौक व मुख्य बाजारपेठेतून मार्गस्थ झाली.

शहरातील मध्यवर्ती खडकपुरा येथे आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच पुणे-सोलापूर महामार्गावरील पथादिव्यांवर भगवे ध्वज लावण्यात आले होते. या प्रसंगी विविध राजकीय पक्षांचे आजी-माजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महापुरुषांच्या अर्धाकृती पुतळे लक्षवेधी
आयोजकांनी मिरवणुकीमध्ये सजविलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवरील रथामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे अर्धाकृती पुतळे ठेवले होते. यानिमित्ताने समतेचा संदेश देण्यात आला. तसेच विविध पारंपारिक कलांचे सादरीकरणही आकर्षणाचा विषय ठरला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com