चिंचेचे झाड पाडताना पक्षांचा बळी

चिंचेचे झाड पाडताना पक्षांचा बळी

Published on

इंदापूर, ता. १६ : येथील मालोजीराजे गढीच्या बाजूचे जीर्ण झालेले शेकडो वर्षांपूर्वीचे चिंचेचे झाड नगरपरिषदेकडून पाडताना योग्य ती खबरदारी न घेतल्याने शेकडो पक्षांचा नाहक बळी गेला आहे.
जुन्या तहसील कचेरीतील धोकादायक झालेल्या चिंचेचे झाडाची पालखीपूर्व योग्य पद्धतीने उपाययोजना करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. मात्र, इंदापूर नगरपरिषदेकडून ऐतिहासिक झाड तोडताना योग्य खबरदारी घेतली नाही. शेकडो चित्रबलाक नाहक बळी गेला. दरवर्षी हजारो चित्रबलाक पक्षी प्रजननासाठी इंदापूरमध्ये येतात. सध्या अनेक पक्षांची पिले झाडावरून उडून जाण्याच्या अंतिम टप्प्यात होती. मात्र या टप्प्यात नगरपरिषदेच्या एका चुकीच्या निर्णयामुळे या पिलांचा नाहक बळी गेला आहे. यामध्ये वटवाघुळांचाही समावेश आहे. दरम्यान वृक्ष तोडताना पक्षांचा बळी गेल्याचे समजतात दौंड येथील रेस्क्यू टीम, इको दौंड ही पक्षी रेस्क्यू टीम, आणि निमगाव केतकीचे फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबचे नचिकेत अवधानी, प्रशांत कौलकर, वैभव जाधव, आशिष हुंबरे, वेदांत घोरपडे यांनी जखमी पक्षांना कोसळलेल्या झाडातून रात्री उशिरापर्यंत बाहेर काढले. यामध्ये पंधराहून अधिक जखमी पक्षी वनविभागाच्या ताब्यात दिले आहेत. या घटनेबद्दल पक्षी प्रेमी आणि नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

ही झाडे शहरात येत असल्याने याचा सर्व अधिकार मुख्याधिकारी यांच्याकडे येतो.
तर मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
- उमेश गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com