इंदापुरात ५ वर्षीय मुलीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

इंदापुरात ५ वर्षीय मुलीचा 
विजेच्या धक्क्याने मृत्यू
Published on

इंदापूर, ता. ७ : शहरातील दर्गा मशीद चौकातील पथदिव्याच्या खांबातून विजेचा धक्का लागल्याने एका ५ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. कुलसूम हैदर मुशाहिदी, असे तिचे नाव आहे.
इंदापूर शहरातील दर्गा मशीद चौकातील पथदिव्याच्या खांबातून गुरुवारी (ता. ६) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कुलसूम हिला वीजेचा धक्का लागला. त्यानंतर चिमुकलीला तत्काळ नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान चिमुकलीच्या मृत्यूस कारणीभूत असल्याप्रकरणी वीज वितरण कंपनी व नगरपरिषद यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत नागरिकांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.