इंदापूरमध्ये राष्ट्रवादी अन्‌ भाजपचे सूत जुळेना

इंदापूरमध्ये राष्ट्रवादी अन्‌ भाजपचे सूत जुळेना

Published on

इंदापूर, ता.१८ : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपला एक गट घेऊन शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पदासह महत्वाचे अर्थ खाते मिळाविले. यामध्ये इंदापूरमधून भाजप राष्ट्रवादीमधील श्रेयवादाची लढाई संपेल, अशी आशा होती. मात्र, सध्या इंदापूरमध्ये उलट चित्र पाहायला मिळत आहे.
उममुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सहभागी होताच आमदार भरणे यांनी जलसंधारणाच्या कामांवरील ५० कोटी रुपयांची स्थगिती उठवल्याचा दावा केला. तसेच पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी इंदापूर तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी ३७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचा दावा केला आणि भाजपकडून ही रस्त्यांच्या कामांसाठी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी २९ कोटी निधी मंजूर करण्यात आल्याचा दावा केला आहे. यावेळी तिजोरीच्या चाव्या अजित पवार यांच्याकडे असल्याचे निदर्शनात आणून दिले.
तर दुसरीकडे इंदापूर तालुक्यातील सहा रस्त्यांच्या कामासाठी राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३ च्या पावसाळी पुरवणीमधून सार्वजनिक बांधकाम विभागाने एकूण २९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देत शिवसेना भाजप युती सरकार राज्यात सत्तेवर आले नंतर पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे निधी मंजूर करण्यात आल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. त्यामुळे राज्य पातळीवर काही का असेना इंदापुरात मात्र श्रेयवादाची ठिणगी कायम असल्याचे दिसून येत आहे. आगामी काळात राजकीय वातावरण तापणार की राज्य पातळीवरून तालुका पातळीपर्यंत जुळवून घेतले जाणार हे पाहवे लागणार आहे.

रस्त्यांच्या कामासाठी निधी
इंदापूर तालुक्यातील रस्त्यांसाठी ३७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये वरकुटे खुर्द पिटकेश्वर घोरपडवाडी मार्गाची सुधारणा करणे- ४ कोटी ५० लाख, लासुर्णे ते कळंब रस्ता करणे-१० कोटी, बावडा ते निरनिमगाव जिल्हा हद्दीपर्यंत रस्ता करणे - ९ कोटी, अकोले ते बोरी रस्ता करणे - १ कोटी ५० लाख, टण्णू ते चव्हाण वस्ती बंधारा ते गावठाण रस्ता करणे - ४ कोटी, वालचंदनगर सराफवाडी रेडा शहाजीनगर भोडणी रस्ता करणे -४ कोटी, सणसर ते रायते मळा खटके वस्ती रस्ता करणे - ४ कोटी या कामांचा समावेश आहे.

56114, 56115

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.