

इंदापूर, ता. १८ : इंदापूर शहरासह परिसरात शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये येथे ध्वजवंदनासह विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
इंदापूर तहसील कार्यालय येथे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी नगराध्यक्षा अंकिता शहा, मुकुंद शहा उपस्थित होते.
इंदापूर पोलिस ठाणे येथे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांचे हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी महिला दक्षता कमिटी सदस्या अनिता खरात उपस्थित होत्या. पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी विजय कुमार परीट यांचे हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.