आचाऱ्यानेच पळवली हॉटेल मालकाची मोटार

आचाऱ्यानेच पळवली
हॉटेल मालकाची मोटार

इंदापूर, ता. १६ : लोणी देवकर (ता. इंदापूर) एमआयडीसी चौकातील एका हॉटेल मालकाची चार चाकी हॉटेलमध्येच कामाला असणाऱ्या आचाऱ्याने चोरून नेली. याप्रकरणी आचारी ओंकार प्रफुल्ल ताटिया (रा. श्रीरामपूर, जि. नगर) याच्या विरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अभिषेक अण्‍णासाहेब दुरगुडे (रा. लोणी देवकर) यांनी फिर्याद दिली की, लोणी देवकर एमआयडीसी चौकामध्ये त्यांचा ढाबा असून, त्यांच्याकडे हुंडाई कंपनीची आय ट्वेन्टी मोटार (क्र. एमएच ४२ के ७८०१) ही हॉटेलवर आचारी म्हणून काम करणाऱ्या ओंकार ताटिया याने काही एक न सांगता घेऊन गेला. त्याच्या विरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com