

इंदापूर, ता. २१ ः इंदापूरमधील तहसील कचेरी व इंदापूर नगरपरिषद व्यापारी संकुलामध्ये सिमेंटकाँक्रिटचा रस्ता केला असून दुभाजक व साइडपट्ट्या न बुजवल्याने अपघाताला निमंत्रण मिळत होते. याबाबत ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच इंदापूर नगरपरिषद प्रशासनाने याची दखल घेत दुभाजक भरले आणि लवकरच साईडपट्ट्यांची ही कामे करण्यात येणार आहेत.
इंदापूर प्रशासकीय भवनाच्या उजव्या बाजूला नगरपरिषदेने व्यापारी संकुल बांधले. या व्यापारी संकुलात मुद्रांक विक्रेते महा-ई-सेवा केंद्र, चहा विक्रेते, झेरॉक्स सेंटर यांच्यासह अन्य व्यावसायिक यांनी आपले व्यवसाय उभा केला आहे. या दोन्हींच्या मधे इंदापूर नगरपरिषदेने लाखो रुपये खर्च करून दोन पदरी सिमेंटकाँक्रिट रस्ता तयार केला आहे. रस्त्याच्या मधे विभाजकासाठी झाडे लावण्यासाठी चारी ठेवलेली. पण, तिचे खड्ड्यात रूपांतर झाले होते. त्याचबरोबर दुतर्फा साइड पट्ट्यांसाठी खड्डे खोदलेले आहेत. त्यामुळे मोटार चुकून रस्त्यावर पुढे नेल्यास त्यास गाडी वळविणे अशक्य बनते. तर साइडपट्ट्या आणि दुभाजक भरलेले नसल्याने अशा स्थितीत गाडी मागे घेणे धोकादायक बनत होते. यामुळे मोठी गैरसोय होत होती. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध होतात या प्रश्नाला वाचा फोडली होती.
इंदापूर नगरपरिषद प्रशासनाने या वृत्ताची दखल घेत तत्काळ दुभाजक भरून सपाटीकरण केले. तसेच लवकरच साईडपट्ट्यांची ही कामे करणार असल्याचे कळविले. दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून धोकादायक स्थितीतील या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
गेल्या अनेक महिन्यांपासून दुर्लक्षित असलेला प्रश्न ‘सकाळ’ने मांडून या भागातील नागरिकांची होणारी गैरसोय प्रशासनाच्या नजरेस आणून दिली. याचा परिणाम म्हणून कामाचा प्राथमिक टप्प्याला सुरुवात झाली आहे. तसेच उर्वरित साइडपट्ट्या भरण्याचे कामही लवकर करण्यात यावे. ‘सकाळ’ने सामाजिक प्रश्न मांडून न्याय देण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल आभार.
- ॲड.ऋषिकेश कोथमिरे
इंदापूर तहसील कार्यालय व व्यापारी संकुलामधील रस्त्याचे अपूर्ण कामे पूर्ण करण्याबाबत नगरपरिषद बांधकाम विभाग तसेच संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. ठेकेदार काम प्राधान्याने पूर्ण करून घेणार आहे.
- रमेश ढगे, मुख्याधिकारी, नगरपरिषद, इंदापूर
या विकास आराखड्यातील रस्त्याचे काम प्रगतिपथावर असून लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. तत्पूर्वी कोणताही अपघात होऊ नये, यासाठी दुभाजकामध्ये माती टाकून घेतली आहे.
- रविराज राऊत, अभियंता, नगरपरिषद, इंदापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.