इंदापूर येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरू

इंदापूर येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरू

इंदापूर, ता. २९ : इंदापूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह येथे इयत्ता आठवी ते दहावी, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, व्यावसायिक महाविद्यालयीन शिक्षण शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु आहे. अशी माहिती वसतिगृह प्रशासनाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.
हे वसतिगृह १०० विद्यार्थ्यांची क्षमता असलेले आहे. तेथे विनामूल्य निवास, अंथरूण, पांघरूण, भोजन, पुस्तके, स्टेशनरी, शैक्षणिक बाबींकरीता आर्थिक सहाय्य, दरमहा ५०० रुपये निर्वाह भत्ता, ग्रंथालय आदी सुविधा पुरविण्यात येतात.
वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या इच्छुकांनी अर्ज भरून द्यावेत. त्यासोबत गुणपत्रिका, पालकांचा उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड प्रत, रहिवासी दाखला, बॅंक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत, शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत, बोनाफाईड किंवा प्रवेश घेतल्याबाबतची शैक्षणिक शुल्क पावती आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. सदरील वसतिगृहामध्ये अनुसूचित जाती संवर्गास ८० टक्के राखीव प्रवेश असून उर्वरित जागांवर इतर प्रवर्ग तसेच अपंग आणि अनाथ विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. असेही निवेदनात नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com