पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांची भेट

पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांची भेट

इंदापूर, ता.११ : ‘सारे शिकूया पुढे जाऊया’ असे म्हणत सुरू केलेल्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यातील शहरासह ग्रामीण भागातील पहिले ते आठवीच्या एकूण ४१६८ शाळांमधील सात लाख ६६ हजार ८५८ विद्यार्थ्यांना यंदा मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ दिला जाणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशीच पाठ्यपुस्तके देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
येत्या शनिवारी १५ जून रोजी नवीन शैक्षणिक वर्षात सुरुवात होत आहे.यादृष्टीने शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावीत, यासाठी शिक्षण विभागामार्फत नियोजन केले गेले. यामध्ये जिल्हास्तरावरून तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी कार्यालयापर्यंत पुस्तके वितरित करण्यात आले. त्यानंतर तालुका स्तरावरून केंद्र आणि शाळा स्तरावर पुस्तके पोहोच झाली असून त्यानुसार २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात जिल्हापरिषदेच्या ३६२१ व खासगी अनुदानित ५४७ अशा एकूण ४१६८ शाळांमधील सात लाख ६६ हजार ८५८ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे.


१०० टक्के मुलांच्या उपस्थितीचे आवाहन
शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यामध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी स्थानिक लोकप्रतिनिधी, पालक, ग्रामस्थ, अधिकारी शाळेत जाऊन मुलांचे स्वागत करून पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. तसेच १० जून ते १४ जून या काळात सर्व शिक्षक गावामध्ये जाऊन पालंकाच्या भेटी घेऊन पहिल्याच दिवशी १०० टक्के मुले उपस्थित ठेवण्यासाठी आवाहन करीत आहेत. यासह शाळा परिसर स्वच्छता, वर्ग स्वच्छता, शालेय स्वच्छता करून घेतली जात आहे. एकंदरीत नवीन शैक्षणिक वर्षात शिक्षण क्षेत्रात नव्याने दाखल होणाऱ्यांचे जोरदार स्वागत करण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील शाळा १५ जूनपासून सुरू होणार आहेत. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध व्हावी, या दृष्टीने शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. त्यानुसार कोणत्याही स्थितीत सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके तसेच विद्यार्थ्यांना फुले देऊन स्वागत करणे, पालक बैठक आयोजित करणे, शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे, आनंददायी बडबड गीते सादर करणे मुलांना खाऊ वाटप करणे अशा विविध प्रकारे कार्यक्रम करून पहिला दिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात येणार आहे.
- संजय नाईकोडी, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद


इंदापूर तालुक्यासाठी मागणी केल्याप्रमाणे सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अनुदानित माध्यमिक शाळा यामधील विद्यार्थी संख्याप्रमाणे पाठ्यपुस्तके शाळा स्तरावर वितरित केले आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके देऊन वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे आनंददायी पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
- अजिंक्य खरात, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बारामती

तालुका..... पात्र विद्यार्थी संख्या
१) आंबेगाव - २७४१७
२) खेड - ५९५५४
३) जुन्नर - ४०१९६
४) मावळ - ४३२१४
५) मुळशी - २५६०१
६) भोर - १९५२९
७) वेल्हे - ४८८६
८) शिरूर - ५८३५९
९) हवेली - १०१७३०
१०) पुरंदर - २६३४०
११) दौंड - ४५०३२
१२) इंदापूर - ४७४७८
१३) बारामती - ४८११२

06544

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com