शरद पवार इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर

शरद पवार इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर

इंदापूर, ता. ११ : देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे बुधवारी (ता. १२) इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावरती येत असून, यावेळी ते टंचाई आणि दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत अशी माहिती इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड. तेजसिंह पाटील व कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी दिली.


यावेळी पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्यात नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई चालू असून शेतकऱ्यांना आणि नागरिकांना पाणीटंचाईचे आणि दुष्काळाचे चटके बसत आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार या भागाला भेट देणार असून या ठिकाणच्या नागरिकांशी संवाद साधत माहिती जाणून घेणार आहे. त्यामध्ये दुपारी चार वाजल्यापासून निरवांगी, खोरीची व बोराटवाडी या भागांना भेटी देणार आहेत.

टंचाईबाबत राज्य सरकार, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांना वेळोवेळी सूचना देऊन ही योग्य ती कार्यवाही होत नाही, आणि या टंचाईग्रस्त गावांच्या पाण्याच्या टंचाई बाबत कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे अनेक गावांना टंचाईचा सामना करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचा दौरा महत्त्वाचा आहे.
- महारुद्र पाटील, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष

लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार हे लगेचच इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असून लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील जनतेला दिलेल्या आश्वासनांची आणि वचनांची पूर्तता करणार असल्याचे दिसत आहे. शरद पवार यांचा हा दौरा इंदापूर तालुक्यासाठी फलदायी ठरणार असून, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ही हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे.
- ॲड. तेजसिंह पाटील, अध्यक्ष, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com