आवदे कुटुंबीय उपोषण करणार

आवदे कुटुंबीय 
उपोषण करणार
Published on

शिर्सुफळ : मागील तीन महिन्यांपासून ग्रामपंचायत गाडीखेल, पशुवैद्यकीय ग्रामीण रुग्णालय शिर्सुफळ, पंचायत समिती बारामती, तहसील कार्यालय बारामती, प्रांताधिकारी कार्यालय बारामती यांच्याकडे पोल्ट्री फार्मच्या अस्वच्छतेमुळे होणाऱ्या दुर्गंधीच्या त्रासाविषयी तक्रार अर्ज केली. तरीही संबंधित अधिकारी फिरकले देखील नाही. गाडीखेल येथील पोल्ट्री फार्मच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून रायचंद किसन आवदे व त्यांचे कुटुंब पोल्ट्री फार्म बंद करण्यासाठी बारामती पंचायत समिती कार्यालयासमोर बुधवारपासून (ता.२) करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे आवदे यांनी सांगितले. मूर्त कोंबड्यांची व्यवस्थित विल्हेवाट न लावता उघड्यावरती फेकून दिली जात आहेत. तसेच उघड्यावर जाळल्यामुळे त्याच्या या परिसरात धूर पसरत आहे. यामुळे रोगराई वाढून परिसरातील ग्रामस्थांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. या परिसरातील राहत असणाऱ्या ग्रामस्थांना मृत कोंबड्यामुळे दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com