मला चांगली झोप लागत होती, आताही लागते : आमदार भरणे

मला चांगली झोप लागत होती, 
आताही लागते : आमदार भरणे
Published on

इंदापूर, ता. ५ : ‘‘मला पूर्वीही चांगली झोप लागत होती, सध्याही चांगली झोप लागत आहे व भविष्यातील लागेल,’’ असा टोला आमदार दत्तात्रेय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर नाव न घेता लगावला.
हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात प्रवेश करण्याची घोषणा केली. याबाबत भरणे म्हणाले, ‘‘जो माणूस लोकांसाठी काम करतो, त्याला स्वतःचा आत्मविश्वास असतो. विरोधकांच्या प्रवेशावर घालमेल व्हायचा विषयच नाही.’’
तुमच्यात आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात विधानसभेची फाईट होणार का? असा प्रश्न विचारला असता आमदार भरणे म्हणाले, ‘‘माझी उमेदवारी अजून फायनल नाही, मला पक्षाने अधिकृत सांगितलेले नाही, पण तुम्ही फायटिंग म्हणत असाल तर मला तर अजून फायटिंग वाटत नाही. मला तर अजून पक्षाने उमेदवारी दिल्याचे माहिती पण नाही. निवडणूक झाली की दुसऱ्या दिवसापासून मी तालुक्यात फिरतो. प्रत्येकाच्या सुखदुःखात जातो. गावात विकासाचा निधी देतो. प्रत्येक माणसाला जेणेकरून कशी मदत करता येईल, आरोग्याच्या बाबतीत कशी मदत करता येईल, जेवढे सहकार्य माझ्याकडून करता येईल तेवढा प्रयत्न मी करत असतो.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com