निमगावातील अपहरणप्रकरणी चार आरोपींना पोलिस कोठडी

निमगावातील अपहरणप्रकरणी 
चार आरोपींना पोलिस कोठडी
Published on

इंदापूर, ता. ५ : निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील रामदास तुकाराम आदलिंग यांच्या अपहरणप्रकरणी चार फरारी आरोपींना अटक करण्यात इंदापूर पोलिसांना यश आले. आरोपींना न्यायालयाने १० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली.
रामदास आदलिंग हे २६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हॉटेलचा किराणा आणण्यासाठी भागवत किराणा स्टोअर्स येथे गेले असता त्यांना अज्ञात चार ते पाच लोकांनी अपहरण केले होते. यावेळी पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत अपहरणकर्त्याची सुटका केली होती, पण या प्रकरणातील आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले होते.
या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अरविंद गटकळ, पोलिस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे, पोलिस अंमलदार अण्णासाहेब कोळेकर यांनी सखोल तपासाबाबत मार्गदर्शन करून पथके नेमली. त्यांनी संतोष बाबा जाधव (वय ४०), आशितोष संजय भोंग (वय २६, दोघेही रा. निमगाव केतकी), आकाश दिलीप बनसोडे (वय २६, रा. चोंडेश्वरवाडी- अकलूज, ता. माळशिरस), अमान समीर शेख (वय २२, रा. माळवाडी, अकलूज) यांना गुन्ह्यात अटक केली. त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यांना इंदापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com