‘नीरा भीमा’ची निवडणूक बिनविरोध होणार?
इंदापूर, ता.१८ : इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून ऊस बिलासाठी अप्पासाहेब जगदाळे यांच्यासह अन्य पदाधिकारी व शेतकऱ्यांनी कारखान्याशी निगडित विविध प्रश्नांवर जोरदार आंदोलन केले होते. यामुळे यंदाची कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार की जगदाळे हे हर्षवर्धन पाटील यांना आव्हान देणार? हे लवकरच स्पष्ट होणार आहे
कारखान्याच्या २१ जागांच्या निवडणुकीसाठी सोमवारपासून (ता.१७) अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. यामध्ये पहिल्या दिवशी एकच अर्ज तर मंगळवारी (ता.१८) दोन उमेदवारांनी चार अर्ज दाखल झाले आहेत. यामुळे एकूण पाच अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे यांनी दिली.
कारखान्याच्या सन २०२४-२५ मध्ये होणाऱ्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीकरिता ३ फेब्रुवारी रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केल्यानंतर निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला त्या अनुरूप सोमवार (ता.१७) पासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. यामध्ये पहिल्या दिवशी कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष लालासाहेब देविदास पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पद्मजा संदीपान कांबळे यांचा एक व संदीपान मारुती कांबळे यांचे तीन असे एकूण चार अर्ज दाखल झाले आहेत.
दरम्यान, कारखान्याची स्थापना झाल्यापासून कारखान्यावर हर्षवर्धन पाटील यांची एकहाती सत्ता आहे. मात्र, .
गटाचे नाव - मतदार संख्या (एकूण ९८७८) - निवडून द्यायचे संचालक संख्या (एकूण २१) - खालीलप्रमाणे
• बावडा - १७१० - ३
• पिंपरी - १२८३ - ३
• सुरवड - २३८९ - ३
• काटी - २२८५ - ३
• रेडणी - २२०३ - ३
• ब वर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था आणि पणन संस्था - मतदार ०८ - १ संचालक
• अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी - १ संचालक
• महिला राखीव प्रतिनिधी - २ संचालक
• इतर मागासवर्ग जातीचे प्रतिनिधी - १ संचालक
• भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गातील प्रतिनिधी - १ संचालक
असा असेल निवडणूक कार्यक्रम
•अर्ज दाखल करणे - १७ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी
•अर्जाची छाननी - २५ फेब्रुवारी
•अंतिम उमेदवारांची यादी - २७ फेब्रुवारी
उमेदवारी मागे घेण्याची मुदत - २७ फेब्रुवारी ते १३ मार्च
•निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम
•यादी व चिन्ह वाटप - १७ मार्च
• प्रत्यक्ष मतदान - २४ मार्च
• मतमोजणी - २६ मार्च
08282
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

